Friday, March 13, 2026 11:09:29 PM

Chhatrapati Sambhajinagar Crime : आधी खेचत कोपऱ्यात नेलं आणि मग...; छत्रपती संभाजीनगरमधील तरुण-तरूणीचा Video Viral

भागात एक तरुण एका तरुणीला बळजबरी करत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे

chhatrapati sambhajinagar crime   आधी खेचत कोपऱ्यात नेलं आणि मग छत्रपती संभाजीनगरमधील तरुण-तरूणीचा video viral

छत्रपती  संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरमधील नागेश्वरवाडीमधील भागात एक तरुण एका तरुणीला बळजबरी करत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील नागेश्वरवाडीमध्ये विद्यार्थी होस्टेलमध्ये राहतात. दरम्याने याच भागातील तरूण-तरूणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, तरुण तिला उचलून नेत असल्याचं दिसून येत आहे. तसेच काहीतरी जबरदस्तीदेखील करताना दिसून येत आहे.  या व्हिडिओमुळे पालक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मुलींना सुरक्षित भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अशा तरुणांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान पोलीस नेमकी काय कारवाई करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री