Monday, March 09, 2026 02:05:07 AM

Mumbai-Pune Expressway Traffic : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीचं कोडं सुटेना, तिसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे...

आज पुन्हा वाहन चालकांना वाहतुकीचा सामना करावा लागणार आहे.

mumbai-pune expressway traffic  पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीचं कोडं सुटेना तिसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुणे लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून अमृताजण ब्रिज पासून ते खोपोली एक्झिट पर्यंत अशा एकूण सात ते आठ किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुण्याच्या दिशेने कोणताही अपघात नाही. वाहनांची गर्दी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे ट्रॅफिक जॅम झाली आहे. आज पुन्हा वाहन चालकांना वाहतुकीचा सामना करावा लागणार आहे. 

हेही वाचा - Harbour Railway : महत्त्वाची बातमी! गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद, कारण... 

32 तासानंतर एक्सप्रेस वे ने मोकळा श्वास घेतला होता. आज दिवसभर पुन्हा वाहन चालकाना वाहतुकीच सामना करावा लागणार आहे. याबाबत माहिती घेतली असता वाहतूक सुरळीत करण्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ 20 मिनिटांचा ब्लॉक घेऊन पुणे लेन व मुंबई लेन दोन्ही लेनवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोडण्यात येणार आहे. 

हेही वाचा - Mhada : म्हाडाच्या योजनेवर तांत्रिक अडचणींचे सावट, अलिशान घरांबद्दल मोठी अपडेट समोर

या वाहतूक कोंडीचा परिणाम उद्या शनिवार व रविवार सलग सुट्टी असल्यामुळे होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडीफोडण्यात बोरघाट महामार्ग पोलीस  शर्थिने प्रयत्न करीत आहेत या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास वाहन चालक पर्यटक आणि स्थानिकांना चांगलाच सहन करावा लागत आहे. थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत अर्थात पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री