महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन ८ डिसेंबर 2025 पासून सुरु होणार आहे. अशातच आताचा अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक सचिवालयाने जारी केले आहे. यामध्ये हे अधिवेशन 19 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याचे समोर आले आले आहे. दरम्यान 10 डिसेबर आणि 11 डिसेम्बर रोजी मागण्यांवर चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे पुरवणी मागण्यांवर ११ डिसेम्बर रोजी चर्चा केली जाणार असून मतदान घेऊन त्या मागण्या मान्य केल्या जातील. तसेच 13 आणि 14 डिसेंबर रोजी सुट्टी असून पुढील आठवड्यात शासकीय कामांचे नियोजन केले जाणार आहे. अखेरच्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर रोजी अशासकीय कामकाज पूर्ण केले जाईल.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा प्रभाव अधिवेशनाच्या कामकाजावर दिसेल. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. यामुळे अधिवेशनात या विषयावर चर्चेची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होतात का ? याकडेही अनेकांचे लक्ष आहे. वेळापत्रकावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले की त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.
हेही वाचा - Mumbai Smart Card: मुंबईत प्रवास होणार आता ‘मुंबई 1 कार्ड’ने; बेस्ट, मेट्रो, मोनो, एसटी आणि लोकलसाठी एकाच कार्डची सोय
राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांसाठी हे अधिवेशन आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अनेक राजकीय घोषणांची शक्यता असून, जनता, कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागून राहिले आहे.
हेही वाचा - Mahavitaran News: सणासुदीत महागाईचा फटका! दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ, प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार
दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी अधिवेशनाची पार्श्वभूमी राजकीय घडामोडींनी गहिरी झाली आहे. सरकारच्या धोरणांवर विरोधकांकडून कडाडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असून, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज दरवाढ, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर अधिवेशनात तीव्र चर्चा होण्याची अपेक्षा आहे.