Saturday, February 14, 2026 01:54:19 PM

Shivai AC Bus : 'शिवनेरी'नंतर आता 'शिवाई'चा पुणे ते बोरीवली प्रवास, जाणून घ्या वेळापत्रक आणि बुकींगची पद्धत

आता पुणे स्टेशन ते बोरीवली या मार्गावर 'शिवाई' बस सुरू करण्यात येणार आहे.

shivai ac bus  शिवनेरीनंतर आता शिवाईचा पुणे ते बोरीवली प्रवास जाणून घ्या वेळापत्रक आणि बुकींगची पद्धत

पुणे-मुंबई प्रवास आता आणखी सोपा आणि जलद होणार आहे. सध्या पुणे-मुंबई मार्गावर शिवनेरी बस प्रवाशांच्या सेवेत आहे. आता पुणे स्टेशन ते बोरीवली या मार्गावर 'शिवाई' बस सुरू करण्यात येणार आहे.  ही बस सेवा शिवाजीनगर आगारातून संचालित करण्यात येणार आहे.

'शिवाई'ची वैशिष्ट्ये: 
'शिवाई' वातानुकूलित बस सेवा सुरक्षित, आरामदायी आणि वेळेची बचत करणारी असल्याने जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.

वेळापत्रक:
पुणे स्टेशन-चिंचवड-सायन मार्गे बोरीवली असा या सेवेचा मार्ग आहे. सकाळी सहा, सात, आठ आणि नऊ वाजता, तर दुपारी एक, दोन, तीन वाजता; तसेच सायंकाळी चार वाजता या बसच्या फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत.

तिकीट कसे बुक कराल?
प्रवाशांना सोयीस्करपणे आगाऊ तिकीट आरक्षण करता यावे यासाठी पुणे स्टेशन बसस्थानक, वल्लभनगर, चिंचवड स्टेशन आणि निगडी या ठिकाणांहून आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय प्रवासी एमएसआरसीटीसी मोबाइल ॲप किंवा https://npublic. msrtcors.com/ या वेबसाइटच्या माध्यमातूनही ऑनलाइन आरक्षण करू शकता.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या