Friday, March 13, 2026 10:24:08 PM

Vishwa Marathi Sammelan at Nashik : नाशकात रंगणार मराठी विश्व संमेलन, उदय सामंतांनी जाहीर केल्या तारखा, जाणून घ्या वेळापत्रक

चार दिवस हे संमेलन मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित केले जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी ही घोषणा केली.

vishwa marathi sammelan at nashik  नाशकात रंगणार मराठी विश्व संमेलन उदय सामंतांनी जाहीर केल्या तारखा जाणून घ्या वेळापत्रक

महाराष्ट्रात निवडणूकांमुळे चौथे विश्व मराठी संमेलन पुढे ढकलण्यात आले होते. त्यासंदर्भात आता घोषणा करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,  नाशिकमध्ये येत्या 26 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान चार दिवस हे संमेलन मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित केले जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी ही घोषणा केली.

याआधी 2025 मध्ये डिसेंबर महिन्यात आयोजित केलेले संमेलन निवडणूकांमुळे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन आणि आगामी कुंभमेळ्याचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आवारात हे संमेलन होणार असून त्यात चार दिवस कार्यक्रम रंगणार आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिवसभर याबाबत नाशिकमधील साहित्यिक, लेखकांशी चर्चा केली. नियोजन आढावा बैठक घेतली व त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा केली. 

कसं असेल वेळापत्रक? 
- संमेलनात 26 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते रात्रीपर्यंत मराठी बोलीभाषा उत्सव साजरा केला जाणार आहे.  

- यात कोकण, विदर्भ, मराठवाडा आदी भागांतील बोलीभाषांवर स्वतंत्र सत्रे असतील. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून 27 रोजी सकाळी ग्रंथ दिंडी काढली जाईल. 

- सायंकाळी पाचला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन प्रदर्शन, होईल.

- त्यानंतर मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 35 पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री