मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे सध्या खूप चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये त्यांनी परिधान केलेले घड्याळ तब्बल एक कोटी रुपयांचे असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. या दाव्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे.
रितू तावडे यांचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसणारे घड्याळ हे ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ मॉडेलचे असल्याचा दावा करण्यात आला होता. या मॉडेलची किंमत सुमारे 60 ते 70 लाख रुपये असून, भारतातील बाजारमूल्य एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते.
हेही वाचा - Bellasis Bridge Reopens: ताडदेव-मुंबई सेंट्रलला जोडणारा पूल वाहतुकीसाठी सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' ऐतिहासिक नाव
दरम्यान यावरूनच आता मोठा वाद सुरू झाला आहे. रितू तावडेंनी या सर्व चर्चांना ब्रेक दिला आहे. या प्रकरणी त्यांनी एक सोशल मिडिया पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.