महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच आता अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांनी थेट सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये खळबळ उडाली आहे.
राजन पाटील हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि प्रभावशाली माजी आमदार म्हणून ओळखले जात होते.मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवारांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर पुन्हा संतापले; जैन बोर्डिंग वादाप्रकरणी पोलिसांकडे करणार तक्रार दाखल
राजन पाटील यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला असून, "राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून मिळालेलं पद असल्याने मी स्वतःहून त्याग करीत आहे", असे नमूद केले आहे.
हेही वाचा - State Election Commission: मतदार यादीतील दुबार नावे तपासणार राज्य निवडणूक आयोग, पारदर्शक निवडणुकांसाठी मोहीम सुरू
राजन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना त्यांनी "निष्ठेला आजच्या राजकारणात स्थान नाही" असं वक्तव्य केलं होतं. यावर "निष्ठेला महत्त्व नाही म्हणता, मग सहकार परिषदचं अध्यक्षपद कसं स्वीकारलं?", असा खोचक प्रश्न सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी विचारला होता.