Sunday, February 15, 2026 08:11:55 AM

Sharad Pawar on NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाआधीच दादांची एक्झिट, अजितची इच्छा पूर्ण करणार; शरद पवार नेमकं काय म्हणाले...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबतही भाष्य केले आहे.

sharad pawar on ncp merger  दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाआधीच दादांची एक्झिट अजितची इच्छा पूर्ण करणार शरद पवार नेमकं काय म्हणाले

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दादांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार? याबद्दल राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा निर्माण झाली. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यावरून आता शरद पवारांनी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबतही भाष्य केले आहे. 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रि‍करणाच्या चर्चांना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. याला दोन्ही राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनीसुद्धा दुजोरा दिला. 

हेही वाचा - Sharad Pawar on Sunetra Pawar :सुनेत्रा पवार थेट मुंबईकडे रवाना, शपथविधीबाबत शरद पवार अनभिज्ञ; दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या आशा धुसर 

अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजितदादादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो असे पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. 

हेही वाचा - पवार कुटुंबात उभी फूट? शरद पवारांशी न बोलताच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार...नेमकं सत्य काय? 

याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. तर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत खंड पडल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असे मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केले. 


सम्बन्धित सामग्री