Baramati-Rahuri ByElection Result: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची मतमोजणी, कोण मारणार बाजी?

23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते.

Baramati-Rahuri ByElection Result:  बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची मतमोजणी, कोण मारणार बाजी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र एक्झिट पोलनुसार बारामतीत सुनेत्रा पवार दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे.

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचाही आजच निकाल लागणार आहे.राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळकेंसह इतर तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान राहुरीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिलेंना जवळपास दीड लाख मतं पडण्याचा अंदाज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number