Saturday, February 14, 2026 01:22:12 PM

Devendra Fadanvis : मैत्रीची परिभाषाच वेगळी! अजित पवारांच्या निधनानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय

भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे.

devendra fadanvis  मैत्रीची परिभाषाच वेगळी  अजित पवारांच्या निधनानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवार प्रचारसभांसाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदीजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला.  अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे मोठे नुकसान झाले.

दरम्याने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण त्यांना अजित पवार यांचे अर्थखाते मिळाले नाही. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांनीची पक्षाची धुरा हातात घ्यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती.

हेही वाचा - Raj Thackeray On NCP Leadership: 'राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाही, पाटील असावा'; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांचा सूचक टोला 

अशातच आता  राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर प्रचार थंड पडला आहे. यादरम्यानच भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे.  फडणवीस 7 दिवसांत 22 प्रचारसभा देवेंद्र फडणवीस करणार होते.  मात्र, त्यांनी आता सर्व सभा रद्द केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी  हा मोठा निर्णय घेतला आहे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या