Eknath Shinde Dasara Melava 2025 : ‘आम्ही वर्क फ्रॉम होम केलं नाही…’, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

. याचवेळी एकनाथ शिंदे यांनी समर्थकांना उद्देशून भाषण केले आहे. या भाषणादरम्यान शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. 

Eknath Shinde Dasara Melava 2025 : ‘आम्ही वर्क फ्रॉम होम केलं नाही…’, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

 आज एकनाथ शिंदे यांचा नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा पार पडत आहे. या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसेना समर्थक उपस्थित राहिले आहेत. याचवेळी एकनाथ शिंदे यांनी समर्थकांना उद्देशून भाषण केले आहे. या भाषणादरम्यान शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. 

सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या पूर्वपरिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बळीराजाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर सरकारकडून सर्व ती मदत करण्यात येईल असेही ते म्हणाले. अनेक शिवसैनिक पुरग्रस्ताची मदत करत आहेत. त्यामुळे समाजकारणाचं व्रत कधीही सोडणार नाही. जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे धावून जाणार. या मेळाव्यामध्ये इथलेच लोक आहेत. तसेच इतर जे शिवसैनिक आहेत ते अन्नदात्याची मदत करत आहेत. बाळासाहेबांनीदेखील हेच केलं असतं. जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या निर्णयामुळे आमची पाठ थोपटली असती. 

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनादेखील टोमणा मारत टिका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही. आम्ही जनतेला जाऊन भेटतो. त्यांचे प्रश्न सोडवतो. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number