राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावरूनही राजकिय वर्तुळात खूप चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं विलीनीकरण होणार का? असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहेत. मात्र, निधनापूर्वी अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा केली होती, अशी माहिती आता समोर आला आहे.17 जानेवारीला यासंदर्भात झालेल्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार यांनीच 12 तारीख ठरवलीली होती असंही शरद पवारांनी सांगितलं.
आता विलिनीकरणाच्या चर्चेसाठी झालेल्या बैठकीचा व्हिडीओ समोर आला आहे. 17 जानेवारीला गोविंदबागेत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह दोन्ही गटातील नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती.अजित पवारांची विलीनीकरणाची ही इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.