Vidhan Parishad : उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हेंसह नऊ सदस्य होणार निवृत्त, जाणून घ्या

नऊ सदस्य निवृत्त होणार आहेत.  यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य निवृत्त होणार आहेत. 

Vidhan Parishad : उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हेंसह नऊ सदस्य होणार निवृत्त, जाणून घ्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा आठवडा सुरू होत आहे.  आता या अधिवेशनासोबतच विधान परिषदेतून तब्बल नऊ सदस्य निवृत्त होणार आहेत.  यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य निवृत्त होणार आहेत. 

आज, सोमवारपासून अधिवेशनाच्या कामकाजाचा पाचवा आणि अखेरचा आठवडा सुरू होत असून, केवळ तीन दिवसच कामकाज असणार आहे. ठाकरे, गोऱ्हे यांच्यासह नऊ सदस्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत 13 मे 2026 रोजी संपत आहे. या नऊ सदस्यांपैकी सर्वाधिक भाजपचे असून, रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी, दादाराव केचे यांचा त्यात समावेश आहे. 

या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शप), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश राठोड यांचीही मुदत संपत आहे. या रिक्त होणार्‍या जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number