Friday, November 07, 2025 11:44:00 AM

Maharashtra Rain Live Update: राज्यात पावसाचा जोर वाढला; कोणत्या जिल्ह्याला, कुठला अलर्ट?, जाणून घ्या.

maharashtra rain live update राज्यात पावसाचा जोर वाढला कोणत्या जिल्ह्याला कुठला अलर्ट जाणून घ्या

 

मुंबई: राज्यात पावसाने वेग पकडला आहे. मुंबई, कोकणात तर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, गोंदिया आणि चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईसह राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. पुढील 3 ते 4 तासांत मुंबई , कोकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पालघर, गोंदिया, चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

कोणत्या जिल्ह्याला, कुठला अलर्ट?
रेड अलर्ट - पालघर , पुणे घाटमाथा, गोंदिया, चंद्रपूर

ऑरेंज अलर्ट - मुंबई ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर

येलो अलर्ट - नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे


सम्बन्धित सामग्री