Friday, March 13, 2026 10:39:31 PM

महाराष्ट्रातील 'या' शहरात उभे राहणार नवीन आयटी पार्क, स्थानिक तरुणांना शहरातच मिळणार रोजगार

त्यामुळे आता सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्रातील या शहरात उभे राहणार नवीन आयटी पार्क स्थानिक तरुणांना शहरातच मिळणार रोजगार

पुणे हे सध्या आयटी हब म्हणून ओळखले जात आहे. महाराष्ट्रात  आता हिंजवडीनंतर आता नवीन ठिकाणी आयटी पार्क तयार केले जात आहे.  याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

होटगी येथील गट नंबर 576 मधील 20 हेक्टर (50 एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला (MIDC) हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत. 

हेही वाचा - Maharashtra Police New Rules : आता 'खाकी स्वॅग' दाखवता येणार नाही! पोलिसांसाठी नवीय नियमावली जाहीर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास... 

सोलापूरच्या विकासाला नवी दिशा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली असून, यामुळे सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.या प्रकल्पामुळे सोलापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणार असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक तरुणांना शहरातच रोजगार मिळावा, यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. सोलापूरच्या वस्त्रोद्योग व्यवसायाला इचलकरंजीच्या धर्तीवर सवलती देण्याबाबत आगामी अधिवेशनात बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

हेही वाचा - HPCL Job Opportunity: अभियांत्रिकी पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विनापरीक्षा भरती सुरू, आजच करा अर्ज 

शहरातील विमानसेवा आणि समांतर जलवाहिनीची कामे पूर्ण झाली असून अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामेही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व निर्णयांमुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


सम्बन्धित सामग्री