ST प्रवाशांसाठी मोठी बातमी! पास काढण्याची पद्धत बदलली,जाणून घ्या नवी प्रक्रिया

MSRTC Pass Now Online : एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने 29 सप्टेंबर 2026 रोजी याबाबतीत एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच मोबाईल अॅप्लिकेशनवर ऑनलाइन पासची सुविधआ ही सुरु केली आहे

ST प्रवाशांसाठी मोठी बातमी! पास काढण्याची पद्धत बदलली,जाणून घ्या नवी प्रक्रिया
MSRTC ची नवीन सुविधा सुरू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. एसटी महामंडळाच्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ या योजनेतील 4 आणि 7 दिवसांते पास हे आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून पास काढता येणार आहे.

आगारात जाण्याचा त्रास संपला
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने 29 सप्टेंबर 2026 रोजी याबाबतीत एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच मोबाईल अॅप्लिकेशनवर ऑनलाइन पासची सुविधआ ही सुरु केली आहे. प्रवाशांची आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास हे मिळतील. हा पास प्रिंट काढून किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरुपात दाखवता येणार आहे.

हेही वाचा-कामाची बातमी! FASTag नियमात मोठे बदल; तुमच्यावर काय परिणाम होणार?जाणून घ्या

QR कोडद्वारे पासची तपासणी
महत्त्वाचे म्हणजे, ऑनलाइन मिळणाऱ्या पासवर आता QR कोड हा असणार आहे. प्रवासादरम्यान वाहकाच्या ईटीआयएस मशीनद्वारेच हा QR कोड स्कॅन करता येईल. स्कॅन केल्यानंतर संबंधित प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार,वैधता शिवाय इतर आवश्यक माहिती ही मशीनवर दिसणार आहे. त्यासोबतच प्रवाशांच्या ओळखपत्राचीही पडताळणी केली जाणार आहे. तपासणी पूर्ण होताच प्रवासाची परवानगी मिळेल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number