Maharashtra weather : राज्यात थंडीचा कडाका शिगेला! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा काय

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचे वारे राज्यभरात वाहू लागले आहेत. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.

Maharashtra weather : राज्यात थंडीचा कडाका शिगेला! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा काय

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचे वारे राज्यभरात वाहू लागले आहेत. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील भागात गारठा वाढत चालला असून उत्तरेकडील गारठ्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

हेही वाचा- Updated Prison Act: तुरुंगात मोबाईल वापरला तर थेट गुन्हा; तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून नागरिकांना पहाटे आणि रात्री तीव्र गारठ्याचा सामना करावा लागत आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रासाठी दिलेल्या इशाऱ्यानुसार धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि जळगाव याठिकाणी तापमानाचा पारा खाली उतरणार असून डाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- PM Kisan Yojana : पीएम किसान योजने चा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात? जाणून घ्या नवं अपडेट

दरम्यान मुंबईचे तापमान 15 अंशांच्या आसपास किमान असल्यामुळे मुंबईकरांना थंडीच्या कडाक्याला सामोरे जावे लागू शकते. यावेळी सांताक्रूझ येथे 14.9 अंश सेल्सिअश किमान तापमान नोंद झाली. तर आज म्हणजेच रविवारी तापमान 18 अंशापर्यंत असेल असा अंदाज आहे. मात्र डिसेंबरच्या अखेरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number