Friday, December 05, 2025 01:49:31 AM

National Water Award : राज्याच्या जल व्यवस्थापन प्रयत्नांना केंद्राची दाद!; देशात जल व्यवस्थापनात महाराष्ट्र अव्वल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने ‘जल समृद्ध भारत’ या संकल्पनेला अनुसरून जल व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.

national water award  राज्याच्या जल व्यवस्थापन प्रयत्नांना केंद्राची दाद देशात जल व्यवस्थापनात महाराष्ट्र अव्वल

मुंबई: केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाअंतर्गत जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राने देशातील सर्वोत्तम राज्याचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. जल संवर्धन, पाण्याचे व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला हा मान मिळाला आहे. महाराष्ट्राबरोबरच नवी मुंबई महानगरपालिकेने “सर्वोत्तम शहरी स्थानिक स्वराज्य संस्था” या श्रेणीत पहिला क्रमांक मिळवला आहे, तर नाशिक येथील कनिफनाथ जल उपयोग सहकारी संस्था हिला “सर्वोत्तम जल उपयोग संस्था” या श्रेणीत दुसरा क्रमांक मिळाला आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांता राव यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. या पुरस्कारांचा वितरण समारंभ 18 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पार पडणार असून, महाराष्ट्राला ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि रोख बक्षीस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने जल व्यवस्थापन आणि संवर्धनात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून देशासाठी आदर्श निर्माण केला आहे. ‘जल समृद्ध भारत’ या दृष्टीकोनातून महाराष्ट्राने शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.

हेही वाचा: Cyber Crime In Akola : 'पाणी बिल भरा, अन्यथा पाईपलाईन तोडू'; असे सांगत सायबर गुन्हेगारांची बँकेतून लाखो रुपयांची लुट

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जल संसाधन (तापी, विदर्भ आणि कोकण बेसिन विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन तसेच जल संसाधन (गोदावरी आणि मराठवाडा विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संपूर्ण जलसंपदा विभागाला अभिनंदन दिले आहे. त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता ही प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद बाब आहे.”

राज्यात गेल्या काही वर्षांपासून जलसंधारण, पर्जन्य जलसाठा वाढविणे, नदी पुनरुज्जीवन आणि सिंचन क्षमता विस्तार यावर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामीण ते शहरी भागात पाणी व्यवस्थापनाचे मॉडेल प्रकल्प म्हणून महाराष्ट्राने अनेक उपक्रम राबवले असून त्याचेच फळ म्हणजे आज हा राष्ट्रीय पुरस्कार राज्याच्या नावावर आला आहे.

हेही वाचा: Coconut Trade Scam : नारळ व्यवसायाच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला लुटले; लाखोंचा बसला फटका


सम्बन्धित सामग्री