Weather Alert: राज्यात येणार मोठं संकट! नागरिकांना हवामान खात्याची चेतावणी; महाराष्ट्रातील हवामानात होणार मोठे बदल

महाराष्ट्रात सध्या कधी दुपारी घामाच्या धारा काढणारे कडाक्याचे ऊन, तर कधी पहाटे अंगात काटा आणणारा गुलाबी गारवा अशा दुहेरी हवामानामुळे नागरिक गोंधळून गेले आहेत. तापमानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार आहेत.

Weather Alert: राज्यात येणार मोठं संकट! नागरिकांना हवामान खात्याची चेतावणी; महाराष्ट्रातील हवामानात होणार मोठे बदल

महाराष्ट्रात सध्या कधी दुपारी घामाच्या धारा काढणारे कडाक्याचे ऊन, तर कधी पहाटे अंगात काटा आणणारा गुलाबी गारवा अशा दुहेरी हवामानामुळे नागरिक गोंधळून गेले आहेत. हिवाळा आता निरोप घेण्याच्या तयारीत असतानाच उन्हाळ्याच्या उकाड्याचे संकेत मिळत असल्याने राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. होळीच्या आधीच थंडी कमी झालेली जाणवते आहे. त्यामुळे हिवाळ्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्यामुळे आणि आकाश बहुतांश ठिकाणी स्वच्छ असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. हवामानातील या बदलांमुळे शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. अचानक उन्हाच्या कडाक्यामुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार आहेत. पुढील हवामान अंदाजांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar : तब्बल 14 लाख रुपयांची लाच, पैशानं भरलेली बॅग; पोलीस अधिकाऱ्याचा बॅगेसोबतचा व्हिडीओ व्हायरल
यादरम्यान कोकण किनारपट्टीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही भागात कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे उबदार आणि उष्णतेची जाणीव अधिक तीव्र होईल. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर याठिकाणी कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस तर, किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. या भागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल.
त्याचसोबत मराठवाडा आणि विदर्भ विभागात नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड आणि परभणी याठिकाणी कमाल तापमान 34 ते 37 अंश तर, किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअस आहे. यामुळे याठिकाणी देखील उकाड्याने नागरिक त्रस्त होण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number