मुंबई : महाराष्ट्रात आजकाल मराठी हिंदी भाषिकांचा वाद सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यातच आता हिंदी मुंबईची बोलीभाषा झाली असल्याचे वक्तव्य परिवहन मंत्री प्रतार सरनाईक यांनी केले आहे. सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. हिंदी आमची लाडकी बहीण असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे.
हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय. हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असं वक्तव्य सरनाईकांनी केलं आहे. सरनाईकांच्या या विधानाची मोठी चर्चा सुरु झाली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी टीका केली आहे तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रताप सरनाई यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.
हेही वाचा : 'राजकारण बाजूला ठेवा, न्याय द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणावर दीपाली सय्यद म्हणाल्या
राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदी समुदाय समोर असल्यानं सरनाईक असे बोलले असतील. याचा अर्थ आम्ही मराठी विरोधात आहोत असं नाही असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. सरनाईकांच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र मनसेनेते यय़वंत किल्लेदार आणि शिउबाठाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. हा भाजपचा आणि अमित शाहांचा विचार आहे. अमित शाहांना जे बोलायचे ते हे लोक बोलतात अशी टीका राऊत यांनी केली आहे. मुंबई मराठी माणसाचीच आहे. मतांच्या लाचारीसाठी मराठी गहाण ठेवणं मान्य नाही असे म्हणत मनसे नेते किल्लेदार सरनाईकांवर टीका केली. सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.