Farmer Loan Waiver: 5 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफी योजनेची तिसरी यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर

राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' या महत्त्वाकांक्षी योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची बहुप्रतिक्षित यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

Farmer Loan Waiver: 5 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफी योजनेची तिसरी यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर

Farmer Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' या महत्त्वाकांक्षी योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची बहुप्रतिक्षित यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. सहकार विभागाकडून पात्र कास्तकारांच्या बँक खात्यांची आणि माहितीची अंतिम तपासणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच आगामी आठवड्यात ही तिसरी यादी अधिकृतपणे जारी केली जाईल. या टप्प्यामुळे राज्यातील तब्बल 5 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांचे 4 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होऊन त्यांची बँक खाती पूर्णपणे निरंक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आधार प्रमाणीकरणानंतर थेट बँक खात्यात रक्कम होणार वर्ग 

दरम्यान, 2 जून 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली होती. यापूर्वी राबवण्यात आलेल्या दोन यशस्वी टप्प्यांमध्ये राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना 5 हजार कोटी रुपयांची भरीव मदत देऊन दिलासा देण्यात आला होता. आता तिसऱ्या टप्प्यात आधार प्रमाणीकरणाची (Aadhaar authentication) प्रक्रिया पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. माहितीतील त्रुटी, नाव किंवा बँक तपशीलातील तफावत आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Dattatray Bharne: बळीराजाला मोठा दिलासा! केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार देणार तातडीने भरीव मदत; कृषी मंत्र्यांची घोषणा

दुष्काळी संकटात बळीराजाला मोठा आधार

या योजनेच्या जलद अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँकांसहित एकूण 53 बँकिंग संस्थांनी 32 लाख कर्जदार शेतकऱ्यांचा डेटा महाआयटी (MahaIT) पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे. सहकार आयुक्तालयाने 25 जुलै रोजी 16 लाख 96 हजार पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती, तर ऑगस्ट अखेरपर्यंत 12 लाख 10 हजार खात्यांचे आधार पडताळणी काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात तिसरी यादी जाहीर होत असल्याने सध्याच्या कठीण परिस्थितीत आणि दुष्काळी छायेत अडकलेल्या राज्यातील बळीराजाला खूप मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number