Onion Farmers : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! थेट बाजार समित्यांमधून होणार कांदा खरेदी

कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नाफेड आणि NCCF कडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Onion Farmers : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! थेट बाजार समित्यांमधून होणार कांदा खरेदी

कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नाफेड आणि NCCF कडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. नाफेड आणि NCCF कडून कांद्याला प्रतिक्विंटल 1,580 रुपये दर निश्चित झाला आहे. अनेक वर्षांपासून नाफेड आणि NCCF ने थेट बाजार समितीत कांदा खरेदी करावी अशी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी होती.

यासंदर्भात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, नाफेड, NCCF आणि बाजार समिती प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन नाफेडकडून थेट बाजार समितीतून खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या निर्णयामुळे कांद्याचे दर वाढण्यासाठी मदत होणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. 

हेही वाचा- Maharashtra Government Land Rules 2026: शासकीय जमिनींच्या व्यवहारांचे अधिकार आता स्थानिक पातळीवर; महसूल विभागाचा नागरिकांना आणि विकासकांना मोठा दिलासा

तर दुसरीकडे राज्य सरकारने शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा, पण हा शासन निर्णय अद्याप कागदावरच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल 2 हजार रुपयांपर्यंत खर्च येत असताना शेतकऱ्याच्या पदरात मात्र 1200 रुपये पडत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला प्रति क्विंटल किमान 2 हजार रुपये भाव जाहीर करावा, अशी आर्त हाक श्रीरामपूर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number