Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार 1500 रुपये

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत देण्यात येणारा दरमहा 1500 रुपयांचा सन्मान निधी आता अवघ्या काही वेळात पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार 1500 रुपये
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana Installment: महाराष्ट्रातील लाखो महिला ज्या आर्थिक मदतीची आतुरतेने वाट पाहत होत्या, त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत देण्यात येणारा दरमहा 1500 रुपयांचा सन्मान निधी आता अवघ्या काही वेळात पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. ऑगस्ट महिन्यातील या हप्त्याचे वितरण सुलभ आणि जलद व्हावे, यासाठी राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तब्बल 339 कोटी 14 लाख रुपयांचा विशेष निधी महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आर्थिक प्रक्रियेला वेग आला असून, येत्या काही तासांतच पात्र महिलांच्या खात्यात थेट डीबीटी (DBT) द्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार रक्कम; मोबाईलवर येणार मेसेज

सामाजिक न्याय विभागाचा निधी प्रामुख्याने मागासवर्गीय कल्याणकारी उपक्रम आणि शिष्यवृत्तीसाठी राखीव असतो; मात्र योजनेची व्याप्ती आणि वेळेत निधी देण्याचे बंधन लक्षात घेऊन हा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवण्यात आला आहे. या निधी वितरणामुळे राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा केली जाईल. बँक खात्यात पैसे जमा होताच संबंधित महिलांच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल. या निर्णयामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळाली असून लाखो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  Eknath Shinde: ड्युटीवर पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती बिघडली! उपमुख्यमंत्री शिंदे मदतीला धावले; शिंदेंच्या तत्परतेने मिळाली तातडीची वैद्यकीय मदत

योजनेचे आर्थिक नियोजन अन् वेळेवर वितरणासाठी सरकारची पावले

राज्य शासनाकडून सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला 1500 रुपये दिले जातात. योजनेची प्रचंड मोठी व्याप्ती पाहता, निधीचा तुटवडा भासू नये आणि हप्ते रखडू नयेत यासाठी सरकार विविध विभागांतील तरतुदींचे नियोजनबद्ध पुनर्गठन करत आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करणे हा त्याच आर्थिक नियोजनाचा एक भाग आहे. यामुळे आगामी सणासुदीच्या काळात राज्यातील महिलांना थेट आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number