Man Falls In Open Manhole : उघड्या गटारात पडला वाटसरू, त्या 55 वर्षीय इसमाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश; रेस्क्यू ऑपरेशनचे थरारक व्हिडीओ समोर

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उघड्या गटारात एक व्यक्ती पडल्याची घटना समोर आली असून, त्या व्यक्तीचा शोध अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून घेण्यात आला आहे. साकीनाका खैरानी रोडमधील उघड्या गटारात पडलेल्या इसमाने नाव अस्लम अन्सारी असून या 45 वर्षीय व्यक्तीला अग्निशामक दलाने बाहेर काढले असून जवळी रुग्णालयात उपचारकरिता घेऊन जाण्यात आले आहे. मात्र, […]

Man Falls In Open Manhole : उघड्या गटारात पडला वाटसरू, त्या 55 वर्षीय इसमाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश; रेस्क्यू ऑपरेशनचे थरारक व्हिडीओ समोर

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उघड्या गटारात एक व्यक्ती पडल्याची घटना समोर आली असून, त्या व्यक्तीचा शोध अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून घेण्यात आला आहे. साकीनाका खैरानी रोडमधील उघड्या गटारात पडलेल्या इसमाने नाव अस्लम अन्सारी असून या 45 वर्षीय व्यक्तीला अग्निशामक दलाने बाहेर काढले असून जवळी रुग्णालयात उपचारकरिता घेऊन जाण्यात आले आहे. मात्र, तिथे त्याला मृत्यू घोषित केल्याचे समजते. 

हेही वाचा : Chembur Bus Accident Tragedy: त्याला खेळायला जायचंय…म्हणत ती माय विहानची बॅट छातीशी कवटाळून बसली, बघणाऱ्यांनाही अश्रू अनावर

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी पाणीदेखील साचलेलं असून त्यामध्येच आता एक उघड्या गटारात फोनवरती बोलत जात असणारा एक व्यक्ती पडल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. याआधी देखील मुंबईच्या महापूर रितू तावडे जेव्हा पाहणी दौऱ्यावरती निघालेल्या होत्या त्याच वेळी पालिकेचा एक कर्मचारी देखील अशाच पद्धतीने मॅनहोलमध्ये पडलेला होता. त्यानंतर साकीनाका परिसरातील ही दुसरी घटना समोर येत आहे. 

नेमकं काय घडलं  

साकीनाका येथील खैरानी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या गटारात मोबाईलवर बोलत असताना ही व्यक्ती खाली पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना गटाराचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. MFB, पोलीस, 108 रुग्णवाहिका व संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number