Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषणाचं हत्यार, अंतरवाली सराटीत आज बैठक; सरकारविरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत

बीड : मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी बीडमधील मराठा समाज हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जेवणाची शिदोरी घेऊन सराटीच्या दिशेने निघाला आहे. आंदोलनानंतर मराठवाड्यासाठी काढण्यात आलेल्या जीआरची अद्याप अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तसेच सातारा गॅझेटदेखील लागू झालेला नाही. शिंदे समितीच्या नोंदी सापडून देखील प्रमाणपत्र […]

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषणाचं हत्यार, अंतरवाली सराटीत आज बैठक; सरकारविरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत

बीड : मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी बीडमधील मराठा समाज हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जेवणाची शिदोरी घेऊन सराटीच्या दिशेने निघाला आहे. आंदोलनानंतर मराठवाड्यासाठी काढण्यात आलेल्या जीआरची अद्याप अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तसेच सातारा गॅझेटदेखील लागू झालेला नाही. शिंदे समितीच्या नोंदी सापडून देखील प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाची सरकारकडून अडवणूक सुरू असल्याचा दावा यावेळी मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे मराठा समाजासोबत सरकारविरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. 

हेही वाचा : Bhor Crime News : नसरापूर प्रकरण ताज असताना भोर तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलावर अत्याचार; 45 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

आज आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असून त्याबाबतची माहिती मनोज जरांगे माध्यमांना देणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा समाजाने मुंबईत आंदोलन केलं, मात्र सरकारने तोंडाला पान पुसली. सरकार आश्वासन देतं, मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. आता किती दिवस शांत राहायचं पुन्हा मुंबईला जाण्याची वेळ पडली तर मुंबईला जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number