Manoj Jarange Patil : मुंबईच्या दिशेने मराठ्यांचं भगवं वादळ! मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आता पुढे काय?

शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुंबईतील दौरा कसा असेल याची सविस्तर माहिती दिली. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष उपस्थितांना विचारुन त्यांच्या सहमतीनेच मुंबईत येण्याचा निर्णय जाहीर केले

Manoj Jarange Patil : मुंबईच्या दिशेने मराठ्यांचं भगवं वादळ! मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आता पुढे काय?

मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या आलेल्या निर्णयानंतर मुंबईत पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. सध्या त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस असून, सरकारने केलेल्या विनंतीनंतर त्यांनी उपचारासाठी होणार दिला. आता ते चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करणार आहेत.

मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय?
शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुंबईतील दौरा कसा असेल याची सविस्तर माहिती दिली. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष उपस्थितांना विचारुन त्यांच्या सहमतीनेच मुंबईत येण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. जरांगे पाटील हे त्यांच्या नियोजित केलेल्या प्रवासामध्ये बीडमधील पाटोदा, अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, पुण्यातील हडपसर तसेच रायगडमधील खोपोली किंवा कोपरखैरणे या ठिकाणी मुक्काम करतील.  त्यानंतर मुंबईत आल्यावर आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करतील. खरं तर हे सर्व आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण मार्गानेच पार पाडावे, असेही आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलेले आहे.

हेही वाचा-Konkan Kanya Express Thane Station : रात्री उशिरा कोकणकन्या ठाण्यात दाखल, पण प्रवाशांना गाडीत चढताच आलं नाही! फलाटावर नेमकं काय घडलं?

या आंदोलनामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांचा त्रास वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या संपूर्ण मुंबईसह उपनगरात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक रस्त्यांवर भाविकांची तुडुंब गर्दी झालेली आहे. त्यातच आंदोलकांची अनेक वाहने दाखल झाल्यावर मुंबईतील प्रमुख रस्ते तसेच सीएसएमटी, मंत्रालय तसेत आझाद मैदान परिसरातील रस्ते हे पूर्णपणे जाम होऊ शकतात. या दिवसात आंदोलक हे सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करण्याची शक्यता असल्याने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number