Wednesday, June 25, 2025 01:47:56 AM

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी मराठा संघटनांकडून सोमवारी बीड बंद

बीडमध्ये दुसरी धक्कादयाक घटना घडली आहे. शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा संघटनाकडून सोमवारी बीड बंद ठेवण्यात आला आहे.

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी मराठा संघटनांकडून सोमवारी बीड बंद

बीड : बीडमध्ये दुसरी धक्कादयाक घटना घडली आहे. शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा संघटनाकडून सोमवारी बीड बंद ठेवण्यात आला आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 

परळीमधील मारहाणीच्या निषेधार्थ संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. याबद्दलची माहिती मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्याकडून देण्यात आली आहे. परळी तालुक्यातील टोकेवाडी येथे शिवराज दिवटेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी व जिल्ह्यातील घटनांच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यातच बीड जिल्हा बंदची हाक दिल्याने बंद कसा होणार याकडे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा : तोतया पोलीस अडकला खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात; भामट्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल

शिवराज दिवटे मारहाण प्रकरण नेमकं काय? 
बीडमधील परळी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे या तरुणाला समाधान मुंडे आणि त्याच्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या टोळक्याने दिवटेचे अपहरण करुन डोंगराळ भागात नेले आणि बांबू व लाकडी दांडक्यांनी  अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराज दिवटेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर माध्यमांशी बोलताना शिवराज दिवटे याने आपल्याला लोखंडी रॉडने मारहाण झाल्याचे सांगितले. तसेच याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा असे टोळक्यातील काहीजण म्हणत असल्याचे शिवराजने सांगितले आहे. 


सम्बन्धित सामग्री