Tuesday, March 17, 2026 02:59:23 PM

Marathi Bhasha Gaurav Din Wishes : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवा हे शुभेच्छा संदेश; स्टेटसलाही नक्की ठेवा

मराठी भाषा गौरव दिन 2026: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मायबोलीचा जागर; मित्र-मैत्रिणींना पाठवा 'या' खास शुभेच्छा

marathi bhasha gaurav din wishes  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवा हे शुभेच्छा संदेश स्टेटसलाही नक्की ठेवा

Marathi Bhasha Gaurav Din Wishes : दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका भाषेचा उत्सव नसून तो महाराष्ट्राची संस्कृती, अस्मिता आणि वैभवशाली साहित्याचा सन्मान आहे. 2013 पासून हा दिवस मराठी भाषिक उत्साहात साजरा करतात. नव्या पिढीला मराठी साहित्याची आणि भाषेच्या समृद्ध वारशाची ओळख करून देणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून 'अभिजात भाषेचा' (Classical Language) दर्जा मिळाल्यानंतरचा हा 2 रा गौरव दिन आहे. 

मराठी राजभाषा दिन आणि गौरव दिन यातील फरक
अनेकदा लोकांचा या दोन दिवसांमध्ये गोंधळ होतो, मात्र यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे:
मराठी भाषा गौरव दिन (27 फेब्रुवारी): हा दिवस कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो.
मराठी राजभाषा दिन (1 मे): 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, म्हणून हा दिवस 'राजभाषा दिन' म्हणून ओळखला जातो.

मराठी भाषा गौरव दिन 2026: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मायबोलीचा जागर; मित्र-मैत्रिणींना पाठवा 'या' खास शुभेच्छा

स्टेटससाठी खास मराठी शुभेच्छा संदेश (Wishes & Quotes)
1. "जात मराठी, धर्म मराठी, शान मराठी, अभिमान मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!"
2. "माझा मराठाची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके... मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
3. "गर्व आहे मला मी मराठी असल्याचा, अभिमान आहे मला मराठी बोलण्याचा! मराठी भाषा गौरव दिन 2026."
4. "रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!"
5. "आमची मायबोली, आमचा अभिमान! शब्दांच्या श्रीमंतीने नटलेल्या मराठी भाषेला मानाचा मुजरा."
6. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी'
"मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!"

7. भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,
मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार,
वळवावी तशी वळते, सहज सगळ्यांना कळते,
भाषेची आमच्या श्रीमंती अपार..
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

8. माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा..
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा..
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

9. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी..
एवढ्या जगात माय मानतो मराठी..
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

10. रुजवू मराठी, फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी..
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

11. मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा...!
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

यंदाचे विशेष आकर्षण
यंदा नाशिकमध्ये 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत चौथ्या 'विश्व मराठी संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाद्वारे जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र आणून मराठी भाषेचा डंका जगभरात वाजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावरही 'माझी भाषा, माझा अभिमान' या हॅशटॅगसह लाखो मराठी प्रेमी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.


सम्बन्धित सामग्री