नागपूर : नागपुरात ऑनलाइन ओळखीच्या ओळखीतून एक महिलेच्या आयुष्यात असा काही प्रकार घडला, ज्यामुळे तिच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. सुरुवातील सर्व काही सामान्या आहे असं वाटलं होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच परिस्थिती बदलली आणि या प्रकरणाची अखेर पोलिस ठाण्यापर्यंत धाव घेण्याची वेळ आली. नेमकं तिच्यासोबत काय घडलं? याचा तपास करत सध्या पोलिसांनी सहा जणांना ठक केली आहे.
नागपूरमधील महिलेसोबत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रुबिना खाने असे पीडित महिलेचे नाव असून यांची व्हॉट्सॲपवर मोहम्मद विशाल चोपडा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. सुरुवातीला महिला आणि या व्यक्तीमध्ये ऑनलाइनच संवाद सुरु झाला. हळूहळू यांची ओळख वाढत गेली. विशालने आपण यूकेमध्ये राहत असून, तिथे सोने आणि कपड्यांचा व्यवसाय करत असल्यांच महिलेला सांगितलं.
ही ओळख वाढल्यानंतर विशालने रुबिना यांच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं होतं. त्याने वेगवेगळ्या माध्यमातून महिलेचा विश्वास पूर्णपणे जिंकून घेतला. एवढंच नाही तर व्हॉट्सॲप कॉलवर यूकेमधील त्यांचं घरही दाखवलं, त्यामुळे रुबिना यांचा त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर विशालने तो भारतात येत असल्यांच सांगितलं. भारतात येताना त्याने आपल्याकडे 70 तोळे सोने आणि 70 डॉलर असल्याचं रुबिनाला सांगितलं होतं. पुढे दिल्ली विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांनी आपल्याला पकडलं असल्याचं सांगत त्याने रुबिनाकडे पैशांची मागणी केली.
अखेर पोलिसांत धाव
सुरुवातील रुबिनाकडून 95 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर आरोपीने वेगवेगळी कारणं देत पुन्हा तिच्याकडून 5 लाख रुपये घेतले. अशाच प्रकार जवळपासून वेळोवेळी तब्बल 20 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, त्यानंतर विशालकडून पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. वारंवर होत असलेल्या या प्रकाराने अखेर रुबिनाला संशय आला. त्यानंतर तिने संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना सांगण्याचा निर्णय घेतला.
अखेर महिलेने गणेशपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून तपासाच्या आधारे तब्बल 6 आरोपींना अटक केली आहे. सध्या या सर्व आरोपींची चौकशी सुरु असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. ऑनलाइन ओळख, लग्नाचं आश्वासन आणि त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी, असा हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.