Nandurbar Fire News : आकाशात धुराचे लोट अन् नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसी कंपन्यांना भीषण आग; आगीच्या विळख्यात परिसर हादरला

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर एमआयडीसी परिसरातील दोन कंपन्यांना आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Nandurbar Fire News : आकाशात धुराचे लोट अन् नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसी कंपन्यांना भीषण आग; आगीच्या विळख्यात परिसर हादरला

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर एमआयडीसी परिसरातील दोन कंपन्यांना आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नवापूरच्या एमआयडीसीत असलेल्या टेक्स्टाईलच्या दोन कंपन्यांना भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच लाखो रुपयांचे नुकसान झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा- Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेपासून 10 टक्के पाणीकपात लागू; धरणांतील साठा खालावल्याने BMC चा मोठा निर्णय

तसेच 2 ते 3 किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसत होते आणि कंपनीच्या आतून झालेल्या मोठ्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता. दरम्यान एमआयडीसी परिसरात आग लागलेल्या कंपन्यांमुळे इतर कंपन्यांनाही आग लागण्याची भीती वर्तावली जात होती. यावेळी एमआयडीसीकडे आग वीज होण्यासाठी कुठल्याही मोठे यंत्रणा दिसून आले नाीह.

घटनेची माहिती मिळताच नवापूर अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून नवापूर अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. आगीची भीषणता पाहता नवापूर नंदुरबार, साक्री, पिंपळनेर, आणि गुजरात राज्यांमधून अग्निशामक बंब मागवले गेले. या घटने दरम्यान एमआयडीसी परिसरात नवापूर पोलीस दाखल झाले असून आग लागलेल्या ठिकाणी न जाण्याचे पोलिसांकडून आवाहन केले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number