सातारा: गेल्या तीन चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सतत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे परिसरातील नदी ओढे नाले भरून पूर्ण क्षमतेने वाहू लागले. यामध्ये मानगंगा नदीवर असणारे आंधळी धरण सुद्धा सोमवारी वाहू लागले आहे. माण तालुक्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून बऱ्याच ठिकाणचे नदी, ओढे आणि नाले भरून वाहू लागले. त्यामुळे, रस्ते पाण्याखाली गेले आणि अनेक गावंचा संपर्क तुटला. तसेच, प्रशासनाच्या वतीने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच, तेथील रस्ते वाहतुकीसाठी बंदही करण्यात आले. 'पर्यायी रस्त्याचा वापर सर्वांनी करावा', असे आव्हान मान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
हेही वाचा: साताऱ्यात पहिल्याच पावसामुळे दणादण; रस्त्यावरून गाडी चालवणं अवघड झाल्याने चक्क बाईकच खांद्यावर उचलली
अशातच, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या कुळकजाई गावात पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला. नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो, मात्र कुळकजाई येथे पावसामुळे रस्ते पूर्णतः चिखलयुक्त आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत. अशा परिस्थितीत वाहन चालविणे अशक्य झाले असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा: विक्रमी पावसामुळे मुंबईत रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक प्रभावित