जातीच्या उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाजाचा विराट मोर्चा; आझाद मैदान परिसरातील वाहतूक ठप्प

आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे.
matang community march
matang community march

मातंग समाजाकडून आज, मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी प्रलंबित राहिल्यामुळे  हे आंदोलन केले जात आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार होते. मात्र पोलिसांना गाफील ठेवून मातंग मोर्चातील आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. परिणामी, या परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा असूनही मातंग मोर्चातील आंदोलकांनी सीएसएमटी परिसरा, मुंबई महापालिका मुख्यालयाचा परिसर व्यापून टाकला. त्यामुळे आता मंत्रालयाकडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. सध्या मातंग मोर्चातील आंदोलकांना रस्त्यावरुन दूर करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासन निर्णय झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, अशी ठाम भूमिका मातंग आंदोलकांनी घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version