Sunday, February 15, 2026 07:06:20 AM

Mayor Reservation 2026 : श्रीमंत महापालिकेची चावी महिलेच्या हाती! जाणून घ्या कोणकोणत्या महानगरपालिकेवर महिलाराज

राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत सुरू झाली आहे. यामध्ये श्रीमंत महापालिका असलेली मुंबईची चावी महिलांच्या हाती गेली असून जाणून घ्या कोणकोणत्या महानगरपालिकेवर महिलाराज आहे.

mayor reservation 2026  श्रीमंत महापालिकेची चावी महिलेच्या हाती जाणून घ्या कोणकोणत्या महानगरपालिकेवर महिलाराज

राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत सुरू झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. यात अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसीसाठी 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापालिकांची सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असलेली मुंबईची चावी महिलांच्या हाती गेली असून जाणून घ्या कोणकोणत्या महानगरपालिकेवर महिलाराज आहे. 


कोणत्या प्रवर्गासाठी किती आरक्षण - 

अनुसूचित जमाती - 1  (कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी सोडत)

अनुसूचित जाती - 3 (ठाणे, जालना (महिला), लातूर (महिला) सोडत)

ओबीसी - 8 (पनवेल, इंचलकरंजी, चंद्रपूर-महिला, जळगाव-महिला, अकोला-महिला, अहिल्यानगर-महिला, उल्हासनगर, कोल्हापूर)

सर्वसाधारण - 17 (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, अमरावती, नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, धुळे, परभणी)

महानगरपालिका महापौरपदालाठी महिला आरक्षण


मुंबई - सर्वसाधारण (महिला)
पुणे - सर्वसाधारण (महिला)
नाशिक - सर्वसाधारण (महिला)
नवी मुंबई - सर्वसाधारण (महिला)
नांदेड-वाघाळा - सर्वसाधारण (महिला)
मालेगाव - सर्वसाधारण (महिला)
धुळे - सर्वसाधारण (महिला)
मीरा-भाईंदर - सर्वसाधारण (महिला)
नागपूर - सर्वसाधारण (महिला)
अमरावती - सर्वसाधारण
भिवंडी-निजामपूर - सर्वसाधारण
पिंपरी-चिंचवड - सर्वसाधारण 
वसई-विरार - सर्वसाधारण
छत्रपती संभाजीनगर - सर्वसाधारण
सांगली-मिरज-कुपवाड - सर्वसाधारण
सोलापूर - सर्वसाधारण
परभणी - सर्वसाधारण

ठाणे - अनुसूचित जाती (SC)
कल्याण-डोंबिवली - अनुसूचित जमाती (ST)
लातूर - अनुसूचित जाती (SC) (महिला)
जालना - अनुसूचित जाती (SC) (महिला)
कोल्हापूर - ओबीसी
उल्हासनगर - ओबीसी
पनवेल - ओबीसी
इचलकरंजी - ओबीसी
अकोला - ओबीसी (महिला)
जळगाव - ओबीसी (महिला)
अहिल्यानगर - ओबीसी (महिला)
चंद्रपूर - ओबीसी (महिला)


सम्बन्धित सामग्री