ब्रेन स्ट्रोकच्या उपचारादरम्यान उलगडलं 33 वर्षांचं गूढ; MRIमध्ये सापडलं..; 1993च्या बॉम्बस्फोटाशी थेट कनेक्शन समोर

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथे वास्तव्यास असलेले सुधीर मोहिते यांच्या शरीरात चक्क बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा हा 33 वर्षे राहिल्याचे समोर आले आहे.

ब्रेन स्ट्रोकच्या उपचारादरम्यान उलगडलं 33 वर्षांचं गूढ; MRIमध्ये सापडलं..;  1993च्या बॉम्बस्फोटाशी थेट कनेक्शन समोर

रत्नागिरी : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाची एक धक्कादायक आठवण तब्बल 33 वर्षांनंतर समोर आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथे वास्तव्यास असलेले सुधीर मोहिते यांच्या शरीरात चक्क बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा हा 33 वर्षे राहिल्याचे समोर आले आहे. सध्याच हिंदुजा रुग्णालयात झालेल्या तपासणीदरम्यान ही धक्कादायक गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आली.

33 वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाची जखम
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर मोहित यांना ब्रेन स्ट्रोकवरील उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सुधीर यांच्या शरीराची एमआरआय तपासणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र,एमआरआय ही मशीन सुरु करतात त्यातून अचानक आवाज येऊ लागला, त्यामुळे आपण करत असलेल्या या तपासणीमध्ये काहीतरी अडथळा असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर डॉक्टरांनी सुधीर यांच्या शरीराची अधिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि समोर जे आलं त्यांनी डॉक्टरही काही वेळ हादरुन गेले.

हेही वाचा-Jalgaon Ganapati News: भाविकांचा हिरमोड! आगमनापूर्वीच मंडळावर बाप्पाच्या विसर्जनाची दुर्दैवी वेळ; 47 हजारांची मूर्ती पण…

सुरुवातीस डॉक्टरांना संशय आल्यानंतर त्यांनी सुधीर यांची पुन्हा पूर्ण शरीराची तपासणी केली. त्यावेळी सुधीर यांच्या ओठाच्या भरच्या भागात धातूचा तुकडा असल्याचे आढळून आले. हा धातूचा तुकडा सुधीर यांच्या शरीरात कसा आणि कधी आला, याची माहिती घेतली तेव्हा या लहानशा धातुच्या तुकड्याचा संबंध थेट 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी असल्याचे समजले.

1993 साली सुधीर यांच्यासोबत काय घडले?
1993 वर्षी मुंबईत झालेल्या भयानक बॉम्बस्फोटाच्या वेळी सुधीर मोहिते हे बसमधून प्रवास करत होते. त्याच वेळी झालेल्या या घटनेत त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झालेली होती. मात्र, त्या घटनेच्या वेळी शरीरात गेलेला हा धातूचा तुकडा त्यांच्या लक्षातच आला नव्हता. त्यामुळे हा तुकडा तब्बल 33 वर्षे त्यांच्या शरीरातच राहिला. अखेर तो 11 सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन तो यशस्वीपणे त्यांच्या शरीरातून बाहेर काढला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number