Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यातील ‘या’ गावांना भूकंपाचे सौम्य धक्के; प्रशासन सतर्क

नाशिक : नाशिक जिल्हात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. एका दिवसलात सलग दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पेठ तालुक्यातील 4 गावांना भूकंपाचे हादरे बसले असून त्यामुळे नागरिकांनी घाबरून तात्काळ घराबाहेर धाव घेतली. नाशिक जिल्ह्यामध्ये आठ दिवसांत तिसऱ्यांचा भूकंपाचे धक्के जाणवले. पेठ तालुक्यातील गोंदे, बोरवट, देवगाव, भयगाव याठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दुपारी 4.53 मिनिटांनी हे […]

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यातील ‘या’ गावांना भूकंपाचे सौम्य धक्के; प्रशासन सतर्क

नाशिक : नाशिक जिल्हात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. एका दिवसलात सलग दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पेठ तालुक्यातील 4 गावांना भूकंपाचे हादरे बसले असून त्यामुळे नागरिकांनी घाबरून तात्काळ घराबाहेर धाव घेतली. नाशिक जिल्ह्यामध्ये आठ दिवसांत तिसऱ्यांचा भूकंपाचे धक्के जाणवले. पेठ तालुक्यातील गोंदे, बोरवट, देवगाव, भयगाव याठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दुपारी 4.53 मिनिटांनी हे धक्के जाणवले. भूकंपाचे सौम्य धक्के असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली. तसेच पहाटेदेखील जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते.

हेही वाचा : Advait Upadhyay Case : बेपत्ता होणे हे अद्वैतचे प्रेयसीला घाबरवण्याचे नाटक की नियोजित कट? तपासाला धक्कादायक वळण

नाशिक जिल्ह्यातील कळवम तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री 12 वाजून 06 मिनिटांनी सर्व जण झोपेत असताना भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे गावकरी घाबरून घराबाहेर पळाले. आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर या परिसरात हे धक्के जाणवले असून नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी कोणतिही जीवितहानी झाली नाही. भूकंपाच्या धक्क्यानंतर वीज पुरवठादेखील खंडीत करण्यात आला होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू निघुडपाडा असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number