राजकीयवर्तूनळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने 22 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आत्महत्या करुन जीवन संपवले आहे. काही महिन्यापूर्वीच अनंत गर्जे यांचा लग्नसोहळा पार पडला. अनंत गर्जे यांच्या लग्नात स्वत: पंकजा मुंडे देखील उपस्थित असून हा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता. मात्र लग्नाला काही महिने झाले असता त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर मुलीच्या घरचे वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले असून त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तिच्या कुटुंबियांचा असा दावा आहे की, तिची आत्महत्या झालेली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अनंत गर्जे मागील अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा पीए म्हणून काम करत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील प्राथमिक तपास सुरू केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात अजून गुन्हा दाखल करून घेतला नाहीये. तपास सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांनी याप्रकरणावर अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया दिली नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्की काय घडले हे स्पष्ट होईल. तसेच पंकजा मुंडे यांनी त्यांचे दौरे देखील रद्द केले आहेत.
दरम्यान याप्रकरणावर तिच्या मामाने अशी माहती दिली की, "अनंत गर्जे यांचे बाहेर काही संबंध असल्याच्या संशयावरुन त्या दोघांमध्ये गेले काही दिवस वाद सुरु होते. याबद्दल तिनी सर्व माहिती तिच्या वडिलांना दिली होती. त्यानंतर तिनी त्याला समजावले होते की यासर्व गोष्टी सोडून दे, मात्र तरी देखील तो सतत चॅटिंग करत होता." असं तिच्या मामाने सांगितले. तसेच त्यांनी पुढे एक धक्कादायक खुलासा केला. यावेळी तिचे मामा म्हणाले की, "आत्म करण्यापुर्वी दोघांमध्ये खुप मोठं भांडण झालं होत. त्याच्या बाहेर असलेल्या संबंधांवरुन तिने त्याला आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती. ज्यावेळेस तिनी जीव संपवला त्यावेळेस अनंत गर्जे हा घरात होता." असा खुलासा तिच्या मामाने केला आहे.