Rohit Pawar : चक्कर, ताप, अशक्तपणा अन्…, रोहित पवारांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

Rohit Pawar : चक्कर, ताप, अशक्तपणा अन्…, रोहित पवारांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान रोहित पवार यांना उपचारांसाठी तात्काळ मुंबईतील ब्रिज कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी रोहित पवार यांना अचानक चक्कर ताप आणि अशक्तपणा जाणवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रिज कैंडी रुग्णालयात रोहित पवार यांची सध्या तपासणी सुरु असून डॉक्टर त्यांची रक्त तपासणी आणी इतर महत्वाच्या चाचण्या करत आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे सातत्याने काम करत आहेत. त्यांचे दौरे देखील सुरू आहेत. इतकचं नव्हे तर त्यांनी आजदेखील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. अधिक कामामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे.

हेही वाचा- Dhananjay Munde : 'राजकारणात राहावं की नाही…'; पंकजा मुंडेंपाठोपाठ धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी स्वत:च ब्रीच कँडी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जाऊन ते तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. तसेच गरज भासल्याच काही तपासण्याही करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. 

रोहित पवार यांनी अलिकडेच पेपरफुटी प्रकरणासह रोजगार, शिक्षण यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरत सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली. अलीकडेच त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने कर्जमाफीच्या अटी शिथील केल्या होत्या. दरम्यान लवकरच ते पुन्हा एकदा सक्रिय होतील.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number