“मराठी माणूस धंदा करू शकत नाही हा भ्रम मनातून काढा, महाराष्ट्रातलं वातावरण हे उद्योगधंद्यांसाठी पोषक आहे म्हणूनच बाहेरचे लोक इथे येऊन धंदा करू लागले” असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मी उद्योजक होणारच’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी माणसाला उद्योगासंदर्भात काही मौलिक सल्ले दिले.
“उद्योजक बनायचं असेल तर, स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि हिंमत तरुण पिढीत असावी असा कानमंत्रही राज ठाकरेंनी दिला.”
गुजराती माणसांच्या आडून मोदींना लक्ष्य करत टोमण्याचा भडीमार करत मराठी माणसांना अनेक सल्लेही त्यांनी यावेळी दिले.
राज ठाकरेंचं भाषण –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.