Monsoon Update: स्कायमेटचा चिंता वाढवणारा अंदाज! अरबी समुद्रातले मान्सूनचे ढग देखील गायब; आता 20 जूननंतर येणार का पाऊस?

कोकणात येऊन थांबलेल्या मान्सून यंदा राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला चिंतेत टाकले आहे. जून महिना अर्ध्यावर आला असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनची अपेक्षित प्रगती झालेली दिसत नाही.

Monsoon Update: स्कायमेटचा चिंता वाढवणारा अंदाज! अरबी समुद्रातले मान्सूनचे ढग देखील गायब; आता 20 जूननंतर येणार का पाऊस?

कोकणात आल्यानंतर थांबलेल्या मान्सून यंदा राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला चिंतेत टाकले आहे. यंदा जून महिना अर्ध्यावर आला असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनची अपेक्षित प्रगती झालेली दिसत नाही. काही ठिकाणी पूर्वमोसमी सरी आणि वादळी पाऊस होत असला तरी व्यापक स्वरूपाचा मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. अशातच मान्सूनबाबत एक महत्त्वाची अपडेट मिळत आहे. 15 ते 20 जूनपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होईल असं सांगितलं जात होतं. मात्र तळकोकणापर्यंत पोहोचलेले मान्सूनचे ढग अरबी समुद्रातून नाहिसे झाले आहेत. त्यामुळे पावसाने पूर्णपणे विराम घेतल्याचे दृष्य आहे. राज्यभरात उष्णतेच्या तीव्र लाटेने जनजीवन हैराण झाले आहे. अशातच स्कायनेटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागरिकांची चिंता वाढवली आहे. 

यावेळी संपूर्ण भारतात 20 जूननंतर हळूहळू मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्यातील क्षेत्रनिहाय अंदाजानूसारस, कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघरमध्ये हलक्या सरींच्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संपूर्ण भारतात मान्सून पूर्णपणे स्थिर होण्यासाठी जुलैचा पहिला किंवा दुसरा आठवडा जावा लागेल.

तर दुसरीकडे प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 48 तास उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर या पनगरातही उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही शांत आहेत. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभावही फारसा नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ओशन डायपोल जर सक्रिय झाला तर मात्र एल निनोचा प्रभाव कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. हिंद महासागरात सकारात्मक आयओडी तयार झाला, तर तो अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढवतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि एल निनोचा प्रभाव असूनही भारतात चांगला पाऊस पडू शकतो. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number