नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून मायलेकीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे जुन्या वादाची कुरापत काढून मायलेकीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जुन्या वादातून निर्माण झालेल्या रागाचा बदला घेण्यासाठी आरोपीने मायलेकीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रवीण उर्फ सोन्या जाधव या हल्लेखोराने मायलेकीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मायलेकी गंभीर जखमी झाल्या असून, मुलीच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तब्बल 30 टाके घालण्यात आले आहेत. गंभीर जखमी मुलीला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मात्र मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर पुढील उपचार करण्यासाठी तिला नाशिक येथील रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे. या घटनेमुळे उंदीरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्ल्यामागील नेमकं कारण, आरोपीचा सहभाग आणि जुन्या वादाची पार्श्वभूमी याबाबत तपास सुरू केला आहे. दरम्यान, अशा प्रकारे किरकोळ किंवा जुना वाद थेट हिंसक हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.