पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. वैष्णवीचे सासू, सासरे, दीर, नवरा आणि नणंद सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. आज पहाटेच्या सुमारास फरार राजेंद्र आणि सुशील हगवणेला पोलिसांनी अटक केली. या दोघांना पोलिस ठाण्यात खाली बसलेलं पाहून वैष्णवीच्या लोभी सासूला रडू फुटले.
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी वैष्णवीच्या सासू, नवरा आणि नणंदेला अटक केली. त्यावेळी सासरा राजेंद्र आणि दीर सुशील फरार होते. पोलिसांची सहा पथके त्यांच्या शोधात होती. आज पहाटे पोलिसांच्या प्रयत्नाला यश मिळाले. पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र आणि सुशील हगवणेला खाली बसवलेलं पाहिल्यानं वैष्णवीची लोभी सासू लता हिला अश्रू अनावर झाले.
हेही वाचा : दमानियांची अजित पवारांवर जोरदार टीका; अजित पवारांना आत्मपरीक्षण करण्याची...
हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवी हगवणे यांच्या सासू लता हगवणे ढसाढसा रडली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये खाली बसवलेलं पाहून लता हगवणे रडली. वैद्यकीय चाचणी करून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तर आधीच पोलीस कोठडीत असणारे शशांक, करिष्मा आणि लता हगवणे देखील हिंजवडी पोलीस कोठडीत आहेत. यावेळी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये खाली बसवलेलं पाहून लता हगवणे यांना रडू कोसळलं.
सुशील हगवणे व राजेंद्र हगवणेंनी 17 तारखेपासून कसा केला प्रवास?
17 तारखेला आलिशान इंडीवर गाडीतून राजेंद्र हगवणे हॉस्पिटलला गेले. त्यानंतर थार या गाडीतून मुहूर्त लॉन्स येथे गेले. नंतर याच गाडीतून वडगाव मावळकडे प्रवास केला. पुढे पवना डॅमकडे रवाना झाले व तेथेच फार्म हाऊसवर मुक्काम केला. त्यानंतर थार गाडीतून आळंदी येथे गेले व एका लॉजवर मुक्काम केला. त्यानंतर 18 तारखेला पुढे याच धार गाडीतून वडगाव मावळ येथे गेले. वडगाव मावळ येथे बंडू फाटक यांच्याकडे बलेनो गाडीने गेले. 19 तारखेला पुसेगावकडे हे दोघेही जण रवाना झाले. पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर हे दोघेही गेले. नंतर पसरणी मार्गे कोगनोळी येथे 19 व 20 तारखेला हॉटेल हेरिटेज येथे मुक्काम केला. त्यानंतर पुढे 21 व 22 तारखेला प्रीतम पाटील मित्राच्या शेतावर मुक्काम केला. पुढे 22 ला रात्री पुण्याकडे रवाना झाले व पुण्यातील मुहूर्त लॉन्स या ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.