MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला मोठं यश; विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर राज्य सेवेसह 3 प्रमुख परीक्षा तूर्तास स्थगित

येत्या 3 ऑक्टोबर 2026 पासून नियोजित असलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेसह इतर दोन महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा मोठा निर्णय आयोगाने घेतला आहे.

MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला मोठं यश; विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर राज्य सेवेसह 3 प्रमुख परीक्षा तूर्तास स्थगित
MPSC चा मोठा निर्णय, ‘या’ 3 परीक्षा पुढे ढकलल्या

MPSC Exam Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 3 ऑक्टोबर 2026 पासून नियोजित असलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेसह इतर दोन महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा मोठा निर्णय आयोगाने घेतला आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर आणि मूल्यांकनावर परीक्षार्थींनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या वाढत्या विरोधाची आणि आक्षेपांची दखल घेत प्रशासनाने जुन्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे चालू वर्षाची संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे.

सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

परीक्षेच्या सध्याच्या पद्धतीची पुनर्रचना करण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचा अहवाल आणि शिफारशी लवकरच सादर होणार आहेत. हीच बाब लक्षात घेऊन अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना आणि पालकांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची आग्रही मागणी लावून धरली होती.

हेही वाचा – पुणे विद्यापीठाकडून मेसची प्रस्तावित दरवाढ स्थगित; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठीही घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 या तिन्ही महत्त्वाच्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या नवीन सुधारित तारखा लवकरच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number