मुंबई: मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.वांद्रे पूर्व परिसरातील बेहराम पाडा भागात ही दुर्घटना घडली.
रविवारी रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात रझाक चाळ आहे. ही इमारत चारमजली आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्यानं तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकले गेले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं. पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी असून बचावकार्य हाती घेण्यात आलं होतं.
स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर ५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.आतापर्यंत १७ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.