Sunday, March 08, 2026 12:45:57 PM

BEST Bus New Route : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 1 मार्चपासून बेस्टच्या वाहतूक मार्गात होणार मोठे बदल, 'या' मार्गावरून तुम्ही प्रवास करता का?

साध्या बसेसच्या मार्गांमध्ये बदल केला जाणार असून काही मार्गांवरील साध्या बसेसचे रूपांतर एसी बसेसमध्ये केला जाणार आहे.

best bus new route  मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी 1 मार्चपासून बेस्टच्या वाहतूक मार्गात होणार मोठे बदल या मार्गावरून तुम्ही प्रवास करता का

मुंबईमध्ये काम करण्यासाठी रोज लोक लाखोच्या संख्येने घराबाहेर पडताना दिसतात. यासाठी ट्रेन, बसचा वापर करतात. मात्र आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून बसेसच्या अनेक महत्त्वाच्या मार्गांमध्ये बदल होणार आहेत. तसेच साध्या बसेसच्या मार्गांमध्ये बदल केला जाणार असून काही मार्गांवरील साध्या बसेसचे रूपांतर एसी बसेसमध्ये केला जाणार आहे.  

अंधेरी स्थानक पश्चिम ते वीरा देसाई मार्गावर मार्गावर धावणारी A- 354 बस, माहुल गाव ते कुलाबा बस स्टेशन पूर्व मार्गावर धावणारी A- 381 बस आणि माजगाव आगार ते ठाण्यातील मुंब्रा फाटा मार्गावर धावणारी A- 412 बस या सर्व मार्गावरील साध्या बसेसचे रूपांतर एसी बसेसमध्ये झाले आहे. कोणत्याही मार्गावरील सेवा बंद न करता सर्व मार्गांवरील सेवा वाढवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. 

हेही वाचा - Rajpal Yadav : तुरुंगातून सुटताच राजपाल यादवची नवी इनिंग; उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू केला 'हा' नवीन व्यवसाय 

त्याचप्रमाणे, A-101 या बसच्या मार्गातही आणखी वाढ होणार आहे. मुंबई सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंट्रल या मार्गावर धावणारी बस आता महात्मा फुले मंडईपर्यंत वाढवली आहे. या बसचा परतीचा प्रवास डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकमार्गे होणार आहे. अनेक बसेसच्या मार्गांमध्ये बदल केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शिवाय, अनेक मार्गांवरील साध्या बसेसचं रूपांतर आता एसी बसेसमध्ये केले जाणार आहे. आरसी चर्च ते नेहरू उद्यान मार्गावर धावणारी A- 903 बस, शास्त्री नगर ते चांदिवली बस स्टॉप पश्चिम मार्गावर धावणारी A- 324 बस, अंधेरी स्थानक पश्चिम ते मिल्लतनगर मार्गावर धावणारी A- 326 बस, अंधेरी स्थानक पश्चिम ते रमेशनगर मार्गावर धावणारी A- 346 बस असणार आहे. 

हेही वाचा - Iran US War 2026: महायुद्धाचा भडका! इराणचा बहरीन, कतारसह आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ला 

A-6 या बस मार्गावरील ही बस बॅकबे आगाराऐवजी कुलाबा आगारापर्यंत धावणार आहे. A-22 या मार्गावरील बस विजय वल्लभ चौकाऐवजी जिजामाता उद्यान (राणीचा बाग) ते मजास आगारापर्यंत धावणार आहे. 69 बस वडाळा आगाराऐवजी शिवडीमधील प्रबोधनकार ठाकरे उद्यानापर्यंत धावणार आहे. A- 515 या मार्गावरील बस सीप्झ गावाऐवजी सीप्झ बस स्टॉपर्यंत धावणार आहे. मुंबई सीएसएमटी ते सांताक्रुझ डेपो या मार्गावर धावणारी A-1 बसच्या मार्गामध्येही बदल केला आहे. A-1 ही बस बांद्रा रिक्लेमेशन आणि बांद्रा पश्चिम बस स्टॉपवरील वळसा बंद करून माहीम कोळीवाडा ते बांद्रा टॉकीजदरम्यान स्वामी विवेकानंद रोड मार्गावरून धावणार आहे.


सम्बन्धित सामग्री