IPL 2025: वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव करत IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये धडक मारली. या विजयामुळे मुंबईने 16 points मिळवत अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवलं.
प्लेऑफसाठी पात्र संघ
- गुजरात टायटन्स (18 points)
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (17 points)
- पंजाब किंग्स (17 points)
- मुंबई इंडियन्स (16 points)
स्पर्धेबाहेर गेलेले संघ:
दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स.
सूर्यकुमार यादवची जबरदस्त खेळी
मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने दमदार फटकेबाजी करत नाबाद 73 धावा केल्या. यामुळे तो ऑरेंज कॅप यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला. त्याने सलग 13 सामन्यांत किमान 25 धावा केल्या आहेत, जी एक विशेष कामगिरी ठरते.
हेही वाचा: Covid 19 Mumbai Cases: मुंबईत पुन्हा कोविड रुग्णसंख्या वाढतेय; BMC कडून जनतेला सतर्कतेचा इशारा
ऑरेंज कॅप यादीतील आघाडीचे फलंदाज:
1. साई सुदर्शन (GT) – 617 धावा
2. शुभमन गिल (GT) – 601 धावा
3. सूर्यकुमार यादव (MI) – 583 धावा
4. यशस्वी जैस्वाल (RR) – 559 धावा
5. विराट कोहली (RCB) – 505 धावा
दिल्लीच्या के.एल. राहुलनेही 500 धावांचा टप्पा पार करत या हंगामातील सातवा फलंदाज ठरला.
बोल्ट आणि बुमराहची जादू
गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने राहुलचा महत्त्वाचा wicket घेत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली. तर बुमराहने 3 wickets घेत पर्पल कॅप यादीत सहावं स्थान मिळवलं.
पर्पल कॅप यादीतील आघाडीचे गोलंदाज:
1. प्रसिध कृष्णा (GT) – 21 wickets
2. नूर अहमद (CSK) – 21 wickets
3. ट्रेंट बोल्ट (MI) – 19 wickets
4. जोश हेजलवूड (RCB) – 18 wickets
5. वरुण चक्रवर्ती (KKR) – 17 wickets
आता रंगणार खऱ्या स्पर्धेची सुरुवात
प्लेऑफचे चार संघ ठरले असून आता सामना अधिक रंगतदार होणार आहे. कोण जिंकेल याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.