Mumbai Water Cut : अल-निनोचा फटका! मान्सूनवर परिणाम; 1 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपातीची शक्यता

मुंबईत 1 मेपासून 10 टक्के पाणीकपात करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

Mumbai Water Cut : अल-निनोचा फटका! मान्सूनवर परिणाम; 1 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपातीची शक्यता

मुंबई : अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत 1 मेपासून 10 टक्के पाणीकपात करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून 10 टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत सध्या 33.60 टक्के पाणीसाठा असून 7 जुलैपर्यंत पुरेल इतका साठा असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढून पाणीसाठ्यात घट होत आहे. मोडक सागर, तानसा, भातसा, वैतरणा आदी धरणांतून दररोज 4,1000 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. वर्षभरासाठी 14.47 लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सद्यपरिस्थितीत पाणीपुरवठा कमी असल्याचे समजते. यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार यंदा जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे 1 मेपासून पाणी कपात लागू केल्यास मुंबईकरांना अखंडित पाणीपुरवठा राखता येईल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Food To Pigeons: उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान; गिरगाव चौपाटीसह विविध भागात अजूनही कबुतरांना खाद्यवाटप; प्रशासन काय भूमिका घेणार?

धरणातील पाणीसाठा (15 एप्रिल 2026) – 

– भातसा : 2,35,439 दशलक्ष लिटर (सर्वाधिक)
– मध्य वैतरणा : 69,106
– अप्पर वैतरणा : 77,045
– तानसा : 40,817
– मोडक सागर : 45,340
– विहार : 15,353
– तुळशी : 3,274

तीन वर्षांची तुलना (टक्के) –

2026 : 33.60 टक्के
2025 : 30.24 टक्के
2024 : 24.54 टक्के

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number