Mumbai Local:आता जास्त वादळीवारा, पाऊस झाला तरी अडकण्याची भीती नाही, मुंबईकरांच्या सुस्साट प्रवासासाठी प्रशासनानं केलं मोठं काम

मात्र पावसाळा म्हटलं की, मुंबईकरांसाठी लोकलचा प्रवास थोडा अडचणीचा ठरतो. पण आता यावर प्रशासनाने लोकल प्रवास सुखकर व्हावा मोठं काम केलं आहे.

Mumbai Local:आता जास्त वादळीवारा, पाऊस झाला तरी अडकण्याची भीती नाही, मुंबईकरांच्या सुस्साट प्रवासासाठी प्रशासनानं केलं मोठं काम

मुंबईमध्ये काही भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने सर्वजण सुखावले आहेत. मात्र पावसाळा म्हटलं की, मुंबईकरांसाठी लोकलचा प्रवास थोडा अडचणीचा ठरतो. पण आता यावर प्रशासनाने लोकल प्रवास सुखकर व्हावा मोठं काम केलं आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होताच झाडे किंवा त्यांच्या फांद्या या ओव्हरहेड वायरवर पडतात, त्यामुळे लोकल सेवा ठप्प होऊन लाखों प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. 

 यंदाचा पावसाळ्यात ही लोकल सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने आणि रेल्वे प्रशासनाने एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुनसार, रविवारी, 31 मे रोजी रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक होता. या मेगाब्लॉकचा फायदा हा महापालिकेच्या उद्यान विभागाने घेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने एक काम केले आहे. 

हेही वाचा – मुंबई MHADA लॉटरीला तुफान प्रतिसाद; 2,640 घरांसाठी हजारो अर्जदारांची झुंबड, किती जणांनी भरली अनामत रक्कम?

यामध्ये  रेल्वे मार्गाबाजूला असलेल्या तसेच ओव्हरहेड वायर्स, रुळांवर झुकलेल्या काही तब्बल 67 हजारांहून अनेक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी ही एकाच दिवसात करण्यात आलेली आहे.त्यामुळे आता ओव्हरहेड वायर्सवर फांद्या पडून लोकल सेवा बंद होण्याचा धोका आता खुपच कमी झालेला आहे. पावसाळ्यापूर्वीच ही हे काम केल्याने यंदा रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि प्रवास न थांबता सुरक्षित होईल, असे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number