Saturday, March 07, 2026 09:01:24 AM

Mumbai Mayor : मोठी बातमी! मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

भाजपच्या रितू तावडे यांची मुंबई महापौरपदी निवड

mumbai mayor  मोठी बातमी मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

आज 7 फेब्रुवारी 2026 ला मुंबईच्या नवीन महापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांची मुंबई महापौरपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदी रितू तावडे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. यावेळी अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली. 11 फेब्रुवारी मुंबई मनपा महापौर निवड होणार आहे. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत.  त्याचसोबत उपमहापौर पदासाठी प्रभाग 5 चे नगरसेवक संजय शंकर घडी यांचे नाव जाहीर करण्यात आले असून सव्वा वर्षासाठी उपमहापौर पद असेल अशी अट ठेवण्यात आली आहे.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या भाजप पक्ष कार्यालयात सर्व नगरसेवक दाखल झाले होते. कार्यालयात पंडित देखील उपस्थित आहेत दरम्यान महापौर पदाच्या निवडीआधी जोरदार शंखनाद पंडितांकडून करण्यात आला असून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. यावेळी यावेळी भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश खणकर उपस्थित आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, गटनेते अमेय घोले उपस्थित आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून महापौरपदाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. दरम्यान भाजपचा महापौर झाला असून शिवसेना शिंदे गटाला उपमहापौरपद मिळाले आहे.


कोण आहेत रितू तावडे?
रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत, त्यांनी 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून, 2017 मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक 121 मधून आणि 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे. त्याचसोबत त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. आज त्यांची वर्णी मुंबईच्या महापौरपदी लागली आहे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या