Friday, December 05, 2025 01:54:22 PM

Mumbai Local Mega Block: मुंबईत रविवारी प्रवास करणार आहात?; कोणत्या मार्गांवर मेगाब्लॉक आहे ते आधी जाणून घ्या

CSMT, विद्याविहार, पनवेल–वाशी आणि पनवेल - ठाणे लोकल सेवांवर याचा मोठा परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले आहेत. प्रवाशांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा.

mumbai local mega block मुंबईत रविवारी प्रवास करणार आहात कोणत्या मार्गांवर मेगाब्लॉक आहे ते आधी जाणून घ्या

मुंबईकरांनी रविवारी घराबाहेर पडताना अधिक सावध राहण्याची गरज आहे, कारण मध्य रेल्वे, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर 16 November 2025 रोजी मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दर रविवारीप्रमाणे यंदाही रेल्वेची दुरुस्ती, ट्रॅकची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक आहे, मात्र या काळात लोकल सेवा उशीराने धावू शकतात आणि काही गाड्या रद्द राहणार असल्याने प्रवाशांना अतिरिक्त गर्दी व त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

हार्बर मार्गावर पनवेल – वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 मेगाब्लॉक असल्यामुळे पनवेलहून CSMT कडे जाणाऱ्या हार्बर लोकल्स सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत आणि CSMTहून बेलापूर - पनवेलकडे जाणाऱ्या लोकल्स सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत रद्द राहतील.

हेही वाचा: Rajkummar Rao and Patralekhaa : लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला मिळालं मोठं गिफ्ट; राजकुमार राव - पत्रलेखाच्या घरी लक्ष्मी आली!

मध्य रेल्वेवरील CSMT ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक असेल. या काळात CSMT ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत धावणाऱ्या डाऊन स्लो लोकल्सना फास्ट मार्गावर वळवले जाईल आणि त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे थांबतील. विद्याविहारनंतर या लोकल्स पुन्हा स्लो मार्गावर धावतील. तसेच घाटकोपर ते CSMT दरम्यान सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत धावणाऱ्या अप धिम्या लोकल्सना देखील फास्ट मार्गाने वळवले असून त्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावरही सेवा पूर्णपणे उपलब्ध नसून पनवेल - ठाणे अप लोकल्स सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत आणि ठाणे - पनवेल डाऊन लोकल्स सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत रद्द राहतील. ब्लॉकदरम्यान प्रवाशांसाठी काही पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. CSMT - वाशी विभागात विशेष लोकल्स चालवण्यात येतील, तसेच ठाणे - वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा सुरू राहील. पोर्ट लाईन संपूर्ण काळात नेहमीप्रमाणे कार्यरत असेल. त्यामुळे रविवारी लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी मार्गांमध्ये झालेल्या बदलांचा विचार करूनच प्रवासाचे नियोजन करावे, आवश्यक असल्यास लवकर निघावे आणि मेगाब्लॉकचा ताण टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा उपयोग करावा. 

हेही वाचा: Nowgam Blast: श्रीनगरमध्ये नौगाम पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; नऊ जणांचा मृत्यू, 29 जखमी

 

सम्बन्धित सामग्री