Monday, June 23, 2025 12:43:05 PM

वरळी भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्याबाबत मुंबई मेट्रोने दिले स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले.

वरळी भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्याबाबत मुंबई मेट्रोने दिले स्पष्टीकरण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले. सांडपाण्याच्या नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याने ही घटना घडली आहे. ही भिंत प्रवेश आणि निर्गमन संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आली होती.

काय म्हणाले एमएमआरसी?

यासंदर्भात एमएमआरसी स्पष्ट करते की, पाणी शिरलेले प्रवेश आणि निर्गमन मार्ग सध्या बांधकामाधीन आहेत आणि ते प्रवाशांसाठी खुले नाहीत. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र आरे जेव्हिएलआर ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि सुरक्षा पथकाने घटनास्थळी तात्काळ कार्यवाही सुरू केली असून, बाधित भागाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची असून, सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल.


सम्बन्धित सामग्री